हुंडा प्रथा पूर्णपणे नष्ट करून, सन्मान, समानता आणि विश्वासावर आधारित विवाहसंस्था उभारणे हा आमचा उद्देश आहे. कन्यामान फाउंडेशनचे स्वप्न आहे की:
महाराष्ट्र आणि भारत हुंडा-मुक्त व्हावा
प्रत्येक मुलीचा विवाह सन्मानाने, दबावाशिवाय आणि विनामूल्य व्हावा
लग्न म्हणजे व्यवहार नाही, तर जबाबदारी आणि नात्यांची सुरुवात असावी
हुंडा न घेता होणाऱ्या विवाहांना प्रोत्साहन देणे
मुलींसाठी पूर्णतः मोफत विवाह स्थळ सेवा उपलब्ध करून देणे
सुरक्षित, सत्य आणि पडताळलेली माहिती देणे
समाजात हुंडा विरोधी जनजागृती करणे
दरवर्षी किमान 1 लाख हुंडामुक्त विवाह घडवणे
कन्यामान फाउंडेशन ही एक सामाजिक उपक्रम (Section 8 NGO) आहे. आजही हजारो मुली:
हुंड्यासाठी मानसिक छळ सहन करतात
लग्नासाठी आर्थिक दबावात येतात
हुंडा न दिल्यामुळे नकार सहन करतात
कन्यामान या अन्यायाविरोधात उभा आहे.
आम्ही कोणतीही: ❌ रजिस्ट्रेशन चार्ज, ❌ प्रीमियम फी, ❌ सर्चचा खर्च घेत नाही.
मुलींसाठी सेवा 100% मोफत आहे.
मोफत नोंदणी
सुरक्षित व पडताळलेली स्पष्ट माहिती
हुंडा नाकारणाऱ्या कुटुंबांची निवड
गोपनीयता व सन्मान
हुंडा न घेण्याची स्पष्ट अट
सामाजिक बांधिलकीची हमी
सत्य व जबाबदार प्रोफाइल
100% हुंडामुक्त विचारसरणी
मुलींसाठी पूर्णतः मोफत सेवा
सामाजिक परिवर्तनासाठी समर्पित
फेक प्रोफाइल नाहीत
व्यावसायिक नाही – सामाजिक उपक्रम
सन्मानावर आधारित विवाह
कन्यामान फाउंडेशन तुमच्या गोपनीयतेचा पूर्ण आदर करते.
आम्ही काय माहिती घेतो ?
नाव, वय, शिक्षण
संपर्क क्रमांक
विवाहसंबंधी मूलभूत माहिती
आम्ही काय करत नाही ?
कोणालाही माहिती विकत नाही
तृतीय पक्षाला डेटादेत नाही
जाहिरातीसाठी वापरत नाही
डेटा सुरक्षितता
सर्व माहिती सुरक्षित सरवर ठेवली जाते
परवानगीशिवाय कोणतीही माहिती शेअर होत नाही
कन्यामान फाउंडेशन ही विवाह घडवून देण्याची हमी देत नाही
ही सेवा सामाजिक सहाय्य स्वरूपाची आहे
कोणताही हुंडा मागणारा प्रोफाइल काढून टाकण्याचा अधिकार आम्हाला आहे
चुकीची माहिती दिल्यास प्रोफाइल रद्द केला जाऊ शकतो
मुलींसाठी सेवा पूर्णतः मोफत आहे
कोणत्याही वादात फाउंडेशनची जबाबदारी मर्यादित राहील
कन्यामान फाउंडेशन:
कोणत्याही लग्नाची कायदेशीर हमी देत नाही
कोणत्याही वैयक्तिक वादासाठी जबाबदार नाही
समाजात बदल घडवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे
हुंडा नाकारणे म्हणजे समाज सुधारण्याची पहिली पायरी.
आमचा विश्वास आहे की:
हुंडा म्हणजे गुन्हा
विवाह म्हणजे सौदा नाही
मुलगी म्हणजे ओझे नाही
हुंडा नाकारा
कन्यामानला साथ द्या
समाज बदलाचा भाग बना